adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

२४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलनात ललवाणी अॅग्रो टुरिझमला ‘स्मार्ट पर्यटन’ पुरस्काराने गौरव

२४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलनात ललवाणी अॅग्रो टुरिझमला ‘स्मार्ट पर्यटन’ पुरस्काराने गौरव भुसावळ प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवा...

२४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलनात ललवाणी अॅग्रो टुरिझमला ‘स्मार्ट पर्यटन’ पुरस्काराने गौरव



भुसावळ प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


तालुक्यातील कुऱ्हे पानाचे शिवारात उभारण्यात आलेल्या ललवाणी अॅग्रो टुरिझमला आंतरराष्ट्रीय वर्ल्ड सेव्हन वंडर संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या *‘स्मार्ट पर्यटन’* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . अमरावती येथे आयोजित २४ वे अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलन , संत चेतना महाकुंभ व प्रकृती-अध्यात्म समागम या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .


श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (एच.व्ही.पी.एम.) , अमरावती येथील स्व. सोमेश्वर पुसदकर स्मृती सभागृहात पार पडलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात उत्तराखंड , जम्मू-काश्मीर , झारखंड , मध्यप्रदेश , हिमाचल प्रदेश , महाराष्ट्र , उत्तर प्रदेश , आसाम , मेघालय यांसह देशातील १६ राज्यांतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती . याप्रसंगी परमपूज्य संत डॉ. शिवयोगीजी महाराज , संत सयाजी महाराज , संत कृष्णकांत महाराज, सुशील महाराज वनवे , ब्रह्माकुमारी सीता दीदी , राजाभाऊ उंबरकर, प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे , त्यागमूर्ती आरती सचदेव , अमरावती जिल्हा वकील संघ तसेच अॅड. क्रांती महाजन यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांचा गौरव करण्यात आला . क्रीडा , साहित्य , शिक्षण , कला , विश्वशांती , राष्ट्रीय सुरक्षा , राष्ट्रीय एकात्मता , सैन्य सन्मान , सहिष्णुता , सामाजिक सेवा आणि पर्यटन क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले 


यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अॅड. डॉ. क्रांती महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , ललवाणी अॅग्रो टुरिझमने अत्यल्प कालावधीत कृषी , पर्यटन , गोसेवा , प्राकृतिक चिकित्सा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून ग्रामीण पर्यटनाला एक नवी दिशा दिली आहे . ललवाणी अॅग्रो टुरिझमने यानिमित्ताने शहरातील नागरिकांना "खेड्याकडे चला , निसर्गाशी नाते जोडा" हा संदेश देत येथे नैसर्गिक , शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करून दिले आहे .

येथील मनजिया रेस्टॉरंटमध्ये शुद्ध शाकाहारी व अस्सल खानदेशी भोजनाची मेजवानी दिली जाते . रेन डान्स , पंचवटी , शिवार फेरी , गणेश मंदिर तसेच येथील आंबा , नारळ , पेरू , बोरे , सीताफळ , रामफळ , अंजीर , संत्री , मोसंबी , सफरचंद , आदी विविध फळबागा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत . शुद्ध हवा , संगीतमय वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनःशांतीचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले .


अॅड. क्रांती महाजन यांनी सांगितले की , या पर्यटनस्थळाला त्यांनी स्वतः भेट देऊन येथील व्यवस्थापन , स्वच्छता , पर्यावरणपूरक उपक्रम , गोसेवा , कृषी विकास आणि पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा यांचे बारकाईने निरीक्षण केले आहे . त्यानंतरच ‘स्मार्ट पर्यटन’ पुरस्कारासाठी या संस्थेची निवड करण्यात आली .


पुरस्कार स्वीकारतांनाना प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी सांगितले की , "एक नवी चेतना आणि एक नवा भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे ." त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय , आप्तस्वकीय , मित्रपरिवार , सहकारी आणि आपल्या कार्यावर प्रेम करणाऱ्या सर्व शुभेच्छुकांना दिले . त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळेच शिक्षण , समाजसेवा , कृषी , गोसेवा , प्राकृतिक चिकित्सा आणि पर्यटन या क्षेत्रांत कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली .येथे येणार्‍या अतीथींची मनोभावे सेवा,त्यांच्या चेहर्‍यावर आनंद,त्यांना निसर्गाचा नैसर्गीक गारवा व गोधनाबद्यल जिव्हाळा देण्याचा संकल्प असल्याचे नम्रपणे नमुद केले.


अॅड. डॉ. क्रांती महाजन यांनी प्रा. डॉ. ललवाणी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करतांनाना सांगितले की , निवृत्तीनंतर विश्रांतीचा मार्ग स्वीकारण्याऐवजी त्यांनी कृषी , गोसेवा आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याची नवी वाट निवडली . त्यांच्या अथक परिश्रमातून उभे राहिलेले ललवाणी अॅग्रो टुरिझम हे जळगाव जिल्ह्यासाठी पर्यटन क्षेत्रातील प्रेरणादायी मॉडेल ठरेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .


प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना यापूर्वीही आदर्श शिक्षक , शिक्षाशिरोमणी , समाजशिरोमणी, उत्कृष्ट संघटक , जीवन गौरव यांसह अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . शिक्षण , समाजसेवा , गोसेवा , कृषी विकास , ग्रामीण पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांनी स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे . त्यांच्या या यशाबद्दल ललवाणी परिवार , आप्तस्वकीय , अलायन्झा शिपिंगचे संचालक मंडळ , सामाजिक , धार्मिक , कृषी व पर्यटन क्षेत्रातील मान्यवर , पांडव ग्रुप , मित्रपरिवार , हितचिंतक तसेच असंख्य शुभेच्छुकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या 



सुसंस्कृत , कार्यक्षम , दूरदृष्टी असलेले आणि शिक्षण , समाजसेवा , धर्मकार्य , गोसंवर्धन , कृषी व पर्यटन या विविध क्षेत्रांत स्वतःला पूर्णतः समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांची ओळख निर्माण झाली असून , आधुनिक संसाधनांचा समाजहितासाठी प्रभावी वापर करणारे प्रेरणादायी उद्योजक म्हणून त्यांचा हा सन्मान सर्वांसाठी अभिमानास्पद ठरला आहे .

No comments