adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बांधिलकी जपत बरोडावासी जिग्नेश जाधव व मित्रमंडळींकडून वनिता विद्यालयातील विद्यार्थिनींना वह्या वाटप.

बांधिलकी जपत बरोडावासी जिग्नेश जाधव व मित्रमंडळींकडून वनिता विद्यालयातील विद्यार्थिनींना वह्या वाटप. नवापूर प्रतिनिधी : पंकज आहिरे (संपादक :...

बांधिलकी जपत बरोडावासी जिग्नेश जाधव व मित्रमंडळींकडून वनिता विद्यालयातील विद्यार्थिनींना वह्या वाटप.



नवापूर प्रतिनिधी : पंकज आहिरे

(संपादक : हेमकांत गायकवाड)

समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी जपत बडोदा येथील जिग्नेश जाधव व त्यांच्या मित्रमंडळींनी वनिता विद्यालय, नवापूर येथील विद्यार्थिनींना वह्यांच्या संचाचे वाटप करून शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

मार्च शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिलभाई सुदामभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला हेमंत जाधव (अध्यक्ष, सप्तशृंगी प्रतिष्ठान), मुख्याध्यापिका एल. के. पाटील मैडम , सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे, दर्पण पाटील, आबा मोरे, पत्रकार पंकज अहिरे, कमलेश पाटील, मनोज बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

वनिता विद्यालयातर्फे वह्या वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार श्रीफळ,गुलाबपुष्प,देऊन करण्यात आले होते. 

यावेळी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींना वह्यांचा संपूर्ण संच वितरित करण्यात आला. हा उपक्रम बरोडावासी दानशूर व्यक्तीमत्व जिग्नेश जाधव व त्यांच्या मित्रमंडळींच्या सामाजिक भावनेतून साकार झाला. त्यांच्या या दातृत्वपूर्ण कार्याबद्दल उपस्थितांनी विशेष कौतुक व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात अनिलभाई पाटील यांनी शिक्षण हे यशाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत विद्यार्थिनींनी नियमित अभ्यास, शिस्त, मेहनत आणि चांगले संस्कार जोपासावेत, असे आवाहन केले. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थिनींना आत्मविश्वास, सातत्य आणि परिश्रम यांच्या बळावर शैक्षणिक प्रगती साधण्याचा संदेश दिला. बरोडावासी दानशूर व्यक्तीमत्व जिग्नेश जाधव व त्यांच्या मित्रमंडळींनी जपलेली सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता विद्यालयाचे आर. व्ही. आघाव सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन बी. एस. भदाणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए. बी. वेंडाईत सर , एम. एस. कुलकर्णी सर , डी. एस. पुराणिक सर ,सौ.एस व्ही वेताळ मैडम,सौ. एम के वसावे मैडम, सौ.ए.के खैरनार मैडम, सौ. प्रमिला मावची मैडम,सौ.प्रियंका गावीत मैडम,

सुमित गावित सर , गौरव गावित सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शेवटी मुख्याध्यापिका एल. के. पाटील मैडम यांनी उपस्थित मान्यवर, दाते, पत्रकार, शिक्षक, पालक व ग्रामस्थांचे आभार मानले. विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची प्रेरणा जागविणारा आणि समाजातील दानशूर वृत्तीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

सदर कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे फलक लेखन एम.एस कुलकर्णी यांनी केले होते.

No comments