adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल साहेब यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव च्या वतीने स्नेह भेट

जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल साहेब यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव च्या वतीने स्नेह भेट जळगांव अ...

जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल साहेब यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव च्या वतीने स्नेह भेट



जळगांव अरुण धनगर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा कोषागार अधिकारी मा. माधव थैल साहेब यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव च्या वतीने स्नेह भेट घेण्यात आली.कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगाव जिल्ह्याच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा देखील करण्यात आली. जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी कास्ट्राईब संघटनेला विविध प्रश्न संदर्भात तात्काळ दखल घेऊन नेहमी सहकार्य केले जाईल असा शब्द दिला. याप्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे , शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके, महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल, कोषागार विभागाचे रवींद्र गायकवाड , जितेंद्र असोदेकर , मारूफ खान , आरोग्य विभागाचे डि.एच.भास्कर , शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव राजीव वानखेडे , महसूल विभागाचे महेश सपकाळे , शेख नूर ,भास्कर घुले , भीमराव देसले ,जलसंपदा विभागाचे जिभाऊ हटकर ,अजय बोरसे ,कृषी विभागाचे किशोर मैराळे ,मनपा विभागाचे नंदकुमार गायकवाड यांची आदी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments