adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"स्कूल चले हम" म्हणत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रवेश सनपुले आश्रमशाळेत प्रवेशोत्सव साजरा

"स्कूल चले हम" म्हणत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रवेश सनपुले आश्रमशाळेत प्रवेशोत्सव साजरा चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड...

"स्कूल चले हम" म्हणत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रवेश

सनपुले आश्रमशाळेत प्रवेशोत्सव साजरा


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात दिशानिर्देश देण्यात आले होते. या हेतूने दिनांक १५ जून वार सोमवार रोजी अनुदानित आश्रमशाळा सनपुले ता.चोपडा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला.

यावेळी दत्तक पालक अधिकारी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक धीरज वारुळे उपस्थित होते. सुरुवातीला प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थान धीरज वारुळे यांनी भूषवले तर मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील,मुख्याध्यापक नितीन पाटील, सनपुले गावातील स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगुबाई भिलाला व पालक याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वीर बिरसा मुंडा यांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पहिल्या दिवशी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता.याच ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच पुष्पगुच्छ व चॉकलेट वाटप करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने माजी विद्यार्थी रोहिदास मेहरशिंग बारेला याचा क्रीडाक्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्याचा गौरव करण्यात आला.तसेच विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील प्रथम,द्वितीय,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना ट्राफि देऊन सन्मान करण्यात आला. विद्यालयाची कामगिरी तसेच उज्वल यशाची परंपरा व शिक्षक करीत असलेल्या विविध उपायोजना याबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. 

पालक आणि विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र तसेच नवगत विद्यार्थी यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले.शालेय व्यवस्थापन समितीची सभा व पालक मेळावा यावेळी आयोजित करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष,सचिव,सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे संचालन गजानन पाटील यांनी केले तर आभार भूषण पाटील यांनी मानले.

No comments