adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

CET परीक्षेत 90.50 टक्के पर्सेंटाईल मिळवून समर्थ पाटील यांची उज्ज्वल कामगिरी; कोसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांच्या हस्ते सत्कार

 CET परीक्षेत 90.50 टक्के पर्सेंटाईल मिळवून समर्थ पाटील यांची उज्ज्वल कामगिरी; कोसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा  मा. ना. गुलाबरावजी पाटील साह...

 CET परीक्षेत 90.50 टक्के पर्सेंटाईल मिळवून समर्थ पाटील यांची उज्ज्वल कामगिरी; कोसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

 मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांच्या हस्ते सत्कार  


विकास पाटील जळगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : तालुक्यातील कोसगाव येथील गुणवंत विद्यार्थी श्री. समर्थ सुगनचंद पाटील याने CET परीक्षेत 90.50 टक्के पर्सेंटाईल प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समर्थच्या या यशामुळे केवळ पाटील परिवाराचाच नव्हे तर संपूर्ण कोसगाव गावाचा गौरव वाढला असून यावल तालुक्याचे नाव जळगाव जिल्ह्यात अभिमानाने उंचावले आहे.

समर्थ हा सौ. निर्मल ताई पाटील व नाना पाटील सर (कोसगावकर) यांचा सुपुत्र असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील साहेब यांनीही समर्थला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याच अनुषंगाने पालकमंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक श्री. नवलसिंग राजे पाटील यांनी समर्थ पाटील याचा विशेष सत्कार करून त्याच्या गुणवत्तेचे कौतुक केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, हितचिंतक व पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समर्थच्या परिश्रम, चिकाटी व जिद्दीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण प्रयत्न व योग्य मार्गदर्शनाच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, याचे समर्थ हे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्याच्या यशामुळे गावातील इतर विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळणार आहे.

समर्थ पाटील याच्या या यशाबद्दल कोसगाव, यावल तालुका तसेच जळगाव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments