मोठा वाघोदा -दसनूर रस्त्यावरील नालीचा ढापा तुटला रहदारीस अडथळा! तात्काळ दुरुस्ती ची मागणी शेतकरी बांधवांना काखेत कळसा आणि गावाला वळसा देत...
मोठा वाघोदा -दसनूर रस्त्यावरील नालीचा ढापा तुटला रहदारीस अडथळा! तात्काळ दुरुस्ती ची मागणी
शेतकरी बांधवांना काखेत कळसा आणि गावाला वळसा देत कापावे लागतेय २किमीचे अंतर
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा बु.दसनूर रस्त्यावरील नालीवरील ढापा तुटल्याने शेतकरी व ग्रामस्थांची रहदारीस तारेवरची कसरत करावी लागत आहे
मोठा वाघोदा बुद्रुक ता. रावेर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून वाघोदा बुद्रुक ते दसनूर - सिगंनूर ते बलवाडी रस्त्याचे काम सुरू आहे मात्र वाघोदा गावाजवळ प्रकाश विद्यालया जवळील नाली वरील ढापा तुटल्याने ग्रामस्थ शेतकरी यांना आपल्या शेतीतील केळी व अन्य पिके वाहतूक करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तसेच या मुळे फेर्याने प्रवास करावा लागत आहे.यारस्ताने पिकअप व्हॅन किंवा केळीचा ट्रक येथून घेऊन जाऊ शकत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांमध्य तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तरी संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी शेतकरी करत आहे.यामुळे मोठ्या अपघात शक्यता नाकारता येत नाही तरी याकडे तत्काळ लक्ष द्यावे.

No comments