TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ चोपड्यात काँग्रेसचे आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशीसह परीक्षा प्रक्रिया पा...
TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ चोपड्यात काँग्रेसचे आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशीसह परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी; छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यात गाजत असलेल्या TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. २९ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, चोपडा येथे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत TET पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या प्रकारामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याने त्यांना न्याय मिळावा व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व इतर व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी, परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी "शिक्षणविरोधी सरकारचा निषेध असो!", "शिक्षणातील भ्रष्टाचार बंद करा!", "TET पेपरफुटीचा निषेध असो!" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, प्रदेश सेवादल उपाध्यक्ष अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, रमेश शिंदे, नगरसेवक रमाकांत ठाकूर, नगरसेवक अमोल पाटील, भरत पाटील, शशिकांत साळुंखे, धनराज पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप साळुंखे, देवा साळुंखे, विकास पाटील, विलास दारुंटे, मंगेश भोईटे, उखाणे तडवी, जहीर खान पठाण, देविदास सोनवणे, विक्रम पाटील, अनिल पाटील, सुमित पाटील, सुधाकर बाविस्कर, गोरख वानखेडे, विलास पटेल, शेखर पावरा, गोपाल पावरा, राजेंद्र पाटील, जाहीर पठाण, नवाब तडवी, जयवद्दीन शेख, विजय विसावे, मुकेश पावरा, भरत पाटील, सर्जन पावरा, देविदास धनगर, बाळकृष्ण पाटील, विशाल बारेला, मोतीलाल पाटील, देविदास पाटील, भगवान पाटील, एम. एन. शिरसाठ, जीवन पाटील, योगेश पाटील, रामचंद्र महाजन, शैलेश वाघ, रेवानंद पाटील, जितेंद्र वाघ, दर्शन पाटील, फर्मान तडवी, चंदू पाटील, मोहन पाटील, विनोद पाटील, गोविंदा महाजन, यशवंत खैरनार, नारायण पाटील, हेमराज पाटील, भगवान पाटील, विजय पाटील, संदीप देसले, अखिल शेख, उस्मान समशेर, आदरया पावरा, गोपाल पावरा, लक्ष्मण पाटील, सतीश पाटील, गोविंद पाटील, ज्ञानेश्वर धनगर, प्रभाकर बोरसे, जितेंद्र परदेशी, अजय सोनवणे, कैलास रूपवंते, सुरेश पाटील, भूषण पाटील, प्रदीप बाविस्कर, व्ही. डी. शिंदे, मयूर पाटील, पी. व्ही. पाटील, कमलेश पाटील, नितीन देशमुख, एस. आर. बोरसे, कार्तिक पाटील, किरण बाविस्कर, महेंद्र पाटील, अनिल दुर्वे, रामदास पावरा, प्रताप सोनवणे, महेश सोनवणे, हर्षल शिंदे, मनिन पाटील, जेकराम पावरा, अमोल पाटील, भूषण पाटील, निवृत्ती पाटील, भगवत सोनवणे, देवराम पाटील, दीपक कारणकाळ आदी चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments