नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण; वटपौर्णिमेनिमित्त शिक्षणातून अध्यात्माकडे अनोखा संदेश..... जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:-...
नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण; वटपौर्णिमेनिमित्त शिक्षणातून अध्यात्माकडे अनोखा संदेश.....
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल: के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान अध्यापनातील आधुनिक पद्धती, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर सुलभक यांनी अनमोल मार्गदर्शन केले. याच प्रसंगी प्रशिक्षणाच्या मधल्या सुट्टीत महिला शिक्षिकांनी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करत त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. शिक्षक प्रशिक्षण आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. "शिक्षणातून अध्यात्माकडे" हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा आदर्श उपक्रम व काम हीच पूजा यावर प्राधान्य देऊन या प्रशिक्षणातून समाजासमोर ठेवण्यात आली. महिला शिक्षिकांनी प्रशिक्षणाला गैरहजर न राहता शंभर टक्के उपस्थितीत केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी श्री. आर.डी.महाजन साहेब व शापोआ.अधीक्षक श्री.जे.डी. पाटील साहेब .पंचायत समिती एरंडोल यांनी संपूर्ण कौतुक केले.


No comments