adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय “आरोग्यदूत पुरस्कार 2026” श्री जितेंद्र पाटील यांना अहिल्यानगर या ठिकाणी सम्मानित करण्यात आलेलाखो रुग्णांसाठी ठरले आधारवड; आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या माध्यमातून निस्वार्थ आरोग्यसेवा

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय “आरोग्यदूत पुरस्कार 2026” श्री जितेंद्र पाटील यांना अहिल्यानगर या ठिकाणी सम्मानित करण्यात आलेलाखो रुग...

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय “आरोग्यदूत पुरस्कार 2026” श्री जितेंद्र पाटील यांना अहिल्यानगर या ठिकाणी सम्मानित करण्यात आलेलाखो रुग्णांसाठी ठरले आधारवड; आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या माध्यमातून निस्वार्थ आरोग्यसेवा




जळगांव प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्याचे तथा ‘आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन’चे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “आरोग्यदूत पुरस्कार 2026” जाहीर करण्यात आला आहे. कल्याण, मुंबई येथून आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी लाखो रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे.


गेल्या दहा वर्षांपासून श्री पाटील यांनी राज्यभरातील सुमारे २७ लाखांहून अधिक रुग्णांना विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. तसेच ३० हजारांपेक्षा अधिक रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियांसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.


मुंबई, ठाणे परिसरातील सुमारे १०३ नामांकित रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना विविध योजना व ट्रस्टच्या माध्यमातून दाखल करून उपचारांचे नियोजन करण्याचे कार्य ते निस्वार्थ भावनेने करीत आहेत. रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांना योग्य व तातडीचे उपचार मिळावेत, हा त्यांच्या सेवाकार्यामागील मुख्य उद्देश आहे.


समाजकार्यातही सक्रिय सहभाग


आरोग्यसेवेबरोबरच श्री पाटील यांनी रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, गरजूंसाठी शस्त्रक्रिया मदत, अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, अपंगांना जयपूर फूट कॅलिपर व सायकल वितरण अशा विविध सामाजिक उपक्रमांतही मोलाचे योगदान दिले आहे.


कोरोनाकाळात गरजू कामगारांना अन्नधान्य, औषधे व आर्थिक मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. भविष्यात वृद्धाश्रम व अनाथाश्रम सुरू करण्याचाही त्यांचा मानस आहे.


 अनेक पुरस्कारांनी सन्मानित


आरोग्य व समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल जितेंद्र पाटील यांना आतापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय व २५६ राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये “बेस्ट अचिव्हमेंट अवॉर्ड 2018”, “ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड 2019”, “हुनर रत्न अवॉर्ड 2021”, “कुवेत आरोग्यदूत पुरस्कार 2024” आणि “राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार 2025” यांचा समावेश आहे.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न यावेळी सरपंच सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

No comments