भारतीय पत्रकार संघ (AIJ) कडून नगर जिल्ह्यातील पाच पत्रकारांचा 'राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान' पुरस्काराने गौरव मुंबई प्रतिनिधी ...
भारतीय पत्रकार संघ (AIJ) कडून नगर जिल्ह्यातील पाच पत्रकारांचा 'राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान' पुरस्काराने गौरव
मुंबई प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मुंबई येथे दि. 26 जुलै 2026 : असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट (AIJ) यांच्या 12 व्या वार्षिक महासभेत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्रातील विविध भागातील पाच पत्रकारांचा "AIJ राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान" पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यामध्ये राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पत्रकार शरद परदेशी, राहुरी फॅक्टरी येथील पत्रकार जालिंदर अशोक आल्हाट, चिंचविहिरे येथील पत्रकार शंकर कवाणे, नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील पत्रकार गीताराम आल्हाट तसेच नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील पत्रकार कमलेश शेवाळे (उर्फ देवा) यांचा समावेश आहे.
सामाजिक बांधिलकी जपत जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणे, निष्पक्ष, निर्भीड आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेद्वारे समाजाप्रती उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल या पत्रकारांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या सन्मानपत्र भारतीय पत्रकार संघ (AIJ) चे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहमद सईद शेख आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष (महाराष्ट्र) सिकंदर नदाफ यांच्याहस्ते गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
या पुरस्काराबद्दल सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




No comments