adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्ह्यातील विकासकामांना गती; 'दिशा समिती' आढावा बैठकीत विविध योजनांचा सविस्तर आढावा

जळगाव जिल्ह्यातील विकासकामांना गती; 'दिशा समिती' आढावा बैठकीत विविध योजनांचा सविस्तर आढावा केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी य...

जळगाव जिल्ह्यातील विकासकामांना गती; 'दिशा समिती' आढावा बैठकीत विविध योजनांचा सविस्तर आढावा

केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांवर चर्चा 


किरण धायले अंतुर्ली/ जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'दिशा समिती' (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) आढावा बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) सहभाग नोंदविण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत नागरिकांना योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे व पारदर्शकपणे कसा मिळेल, याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस सह-अध्यक्ष मा. खासदार स्मिताताई वाघ, मा. आमदार संजय सावकारे, जळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर, महानगरपालिका आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवून विकासकामे गतिमान करण्यावर भर देण्यात आला. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

जिल्ह्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून विकासकामांचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments