स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूरात भावपूर्ण अभिवादन; रुग्णांना फळवाटप, महसूल समाधान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन स्व. अजितदा...
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूरात भावपूर्ण अभिवादन; रुग्णांना फळवाटप, महसूल समाधान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन
स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना नवापूरचा मानवंदनेचा सलाम; विकासकार्यांना उजाळा, सामाजिक सेवेचा संदेश
पंकज अहिरे नवापूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूर नगरपालिकेच्या वीर एकलव्य सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावीत, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, बांधकाम सभापती भालचंद्र गावीत, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक धर्मेश पाटील, मनोहर गावीत, शिरीष प्रजापत, उमेश चव्हाण, नविद शहा, सी.ए. वतन अग्रवाल, सोमित्र गावीत, अल्तमस खाटीक, महिला व बालकल्याण सभापती मनीषा मावची, सभापती संगीता देसले, भाग्यश्री गावीत, महिला शहराध्यक्षा चित्रा चव्हाण, जिल्हा सदस्य सरला वळवी, रेखा सावरे, कल्पना चौधरी, माजी उपनगराध्यक्ष फारुक शहा, मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील, अमृत लोहार, माजी नगरसेवक जैनू गावीत, सेफ व्होरा, महेंद्र दुसाने, आर. वाय. पाटील, अयुब गावीत, आंबादास आतारकर, जयेश जयस्वाल, राजू आगळे, अविनाश वसावे, इरफान कुरेशी, संजय सोनवणे, विजय पाटील, जीवन साळी, रणजीत गावीत, जितू अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल गावीत तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भरतभाऊ गावीत यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव करत नवापूर शहरासाठी मंजूर झालेल्या ९४ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. विकासकामांबाबत त्यांची दूरदृष्टी आणि जनहिताची भूमिका कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच २३ जुलै रोजी टाऊन हॉल येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात’ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भरतभाऊ गावीत यांनी केले. मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनीही नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून समाजसेवेची परंपरा जपण्यात आली. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments