adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : मोहन शालिग्राम बेलदार प्रत्येक पात्र मतदाराने आपली माहिती पडताळून आवश्यक दुरुस्ती करावी; लोकशाही बळकटीकरणासाठी ग्रामपंचायत सदस्यांचे आवाहन

  विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : मोहन शालिग्राम बेलदार  प्रत्येक पात्र मतदाराने आपली माहिती पडता...

 विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : मोहन शालिग्राम बेलदार 

प्रत्येक पात्र मतदाराने आपली माहिती पडताळून आवश्यक दुरुस्ती करावी; लोकशाही बळकटीकरणासाठी ग्रामपंचायत सदस्यांचे आवाहन 


किरण धायले | अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राज्यात सध्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियान सुरू असून, लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक व विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत सदस्य मोहन शालिग्राम बेलदार यांनी स्वतः विशेष पुनर्निरीक्षणाचा अर्ज भरून आपली मतदार नोंद अद्ययावत केली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मतदार यादीमध्ये प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक व अद्ययावत नोंद असणे ही सुदृढ लोकशाहीची मूलभूत गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या नावाची व इतर माहितीची वेळेत पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी.

ते पुढे म्हणाले की, अचूक आणि अद्ययावत मतदार यादीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.

मोहन शालिग्राम बेलदार यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र मतदाराची माहिती तपासा. आवश्यक असल्यास संबंधित अर्ज भरून मतदार यादी अद्ययावत करा आणि लोकशाही बळकटीकरणाच्या या महत्त्वपूर्ण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवा."

No comments