adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप...! बोगस सोयाबीन बियाणे कंपनीवर कारवाई करा अक्षय पाटील यांची उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी....!

 पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप...!  बोगस सोयाबीन बियाणे कंपनीवर कारवाई करा अक्षय पाटील यांची उपविभागीय कृषी अधि...

 पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप...! 

बोगस सोयाबीन बियाणे कंपनीवर कारवाई करा अक्षय पाटील यांची उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी....! 


खामगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव :- यावर्षी उशिरा झालेली पेरणी तसेच महागलेली बियाणे यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला असताना अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जामोद तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात असतो या वर्षी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरुवात केल्यानंतर काही कंपन्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप  निर्माण झालेल्याचे दिसत आहे.

मुळात शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती असून पेरलेले बी उगवलेच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे ज्या कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवले नाही त्या कंपनीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या या मागणीसाठी दिनांक 16 जुलै रोजी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी उपविभागीय कृषी अधिकारी व्यवहारे साहेब यांची खामगाव येथे भेट घेतली. जर का नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा चर्चे दरम्यान देण्यात आला.

No comments