adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लग्नात "माझं नाव माईकवर का घेतलं नाही?" विचारत तलाठ्याने सूत्रसंचालकाचे माइकनेच डोकेच फोडले..!

 लग्नात "माझं नाव माईकवर का घेतलं नाही?" विचारत तलाठ्याने सूत्रसंचालकाचे माइकनेच डोकेच फोडले..!  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-...

 लग्नात "माझं नाव माईकवर का घेतलं नाही?" विचारत तलाठ्याने सूत्रसंचालकाचे माइकनेच डोकेच फोडले..! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- लग्नकार्यात आनंदाचे वातावरण असतानाच एका क्षुल्लक कारणावरून शासकीय पदावर असलेल्या व्यक्तीने दाखवलेल्या मग्रूरतेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. "माईकवर माझे नाव का पुकारले नाही?" एवढ्याशा कारणावरून एका सरकारी तलाठ्याने भर मंडपात सूत्रसंचालन करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे मारहाण करत त्याचे डोके फोडल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.या हल्ल्यात सूत्रसंचालक गंभीर जखमी झाला असून,आरोपी तलाठ्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील प्रसिद्ध ‘मातोश्री मंगल कार्यालयात’ एका भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.लग्न लागण्याची वेळ असल्याने मंडपात पाहुण्यांची मोठी गर्दी होती.या लग्नकार्यात अशोक रामचंद्र पठाडे हे सूत्रसंचालक (अँकर) म्हणून काम पाहत होते.ते व्यासपीठावरून अत्यंत उत्साहात माईकद्वारे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रतिष्ठितांची आणि पाहुण्यांची नावे पुकारून त्यांचे स्वागत करत होते.​लग्न सोहळा ऐन रंगात आलेला असतानाच, तिथे उपस्थित असलेले तलाठी शिवाजी सखाराम हजारे हे अचानक व्यासपीठाजवळ आले.त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता.त्यांनी थेट अशोक पठाडे यांना गाठले आणि हुज्जत घालण्यास सुरुवात केली. "तू माईकवर माझे नाव का घेतले नाही? माझी प्रतिष्ठा तुला माहीत नाही का?" असा जाब विचारत या मग्रूर तलाठ्याने भर मंडपात,शेकडो लोकांसमोर पठाडे यांना घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात केली.​वाद एवढ्यावरच थांबला नाही. संतापाच्या भरात भान हरपलेल्या तलाठी शिवाजी हजारे यांनी अशोक पठाडे यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांनी थेट पठाडे यांच्या हातातील जड आणि लोखंडी माईक हिसकावून घेतला आणि तो थेट पठाडे यांच्या डोक्यात घातला.हा वार एवढा भीषण होता की,पठाडे यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि ते जागीच कोसळले.​भर लग्नात रक्ताचा सडा पडल्याचे पाहताच लग्नमंडपात एकच गोंधळ आणि पळापळ उडाली. उपस्थितांनी तात्काळ धाव घेत मध्यस्थी केली आणि मग्रूर तलाठ्याला बाजूला केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अशोक पठाडे यांना नातेवाईकांनी तात्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून,सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.​या संतापजनक घटनेनंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.पीडित अशोक पठाडे यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी आरोपी तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

​एका जबाबदार आणि सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शासकीय पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने केवळ वैयक्तिक अहंकारापोटी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेल्या या गुंडगिरीमुळे सामान्य जनतेतून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "अशा मग्रूर शासकीय कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर कडक कारवाई करावी," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

No comments