adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येणारा ४५ हजार रुपयांचा गोवंश जप्त, दोन विधीसंघर्षग्रस्त बालके पोलिसांच्या ताब्यात.

अडावद पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येणारा ४५ हजार रुपयांचा गोवंश जप्त, दोन विधीसंघर्षग्रस्त बालके पोलिसांच्या ताब्यात ...

अडावद पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येणारा ४५ हजार रुपयांचा गोवंश जप्त, दोन विधीसंघर्षग्रस्त बालके पोलिसांच्या ताब्यात


गुप्त माहितीच्या आधारे शेतकी शाळेमागील कच्च्या रस्त्यावर सापळा रचून कारवाई; दोन गायी सुरक्षितपणे कामधेनू गोशाळेत रवाना 
 AI निर्मित काल्पनिक फोटो 


चोपडा तालुका प्रतिनिधी

संपादक : हेमकांत गायकवाड

अडावद,: अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असलेला सुमारे रु. ४५ हजार किमतीचा गोवंश जप्त केला असून, या प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास अडावद पोलिसांना गोवंश कत्तलीच्या उद्देशाने नेला जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी शेतकी शाळेच्या पाठीमागील कच्च्या रस्त्यावर सापळा रचून कारवाई केली. यावेळी दोन गावठी गायींना क्रूरतेने पायी चालवत नेणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान रु. ४५ हजार किमतीच्या दोन गावठी गायी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाला कोणतीही इजा होऊ नये आणि त्यांची योग्य काळजी घेता यावी यासाठी त्यांना तात्काळ कामधेनू गोशाळेत सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. या प्रकरणी अडावद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१४६/२०२६ नुसार प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(क) व (ड), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमातील कलम ५अ, ५ब तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाठ हे करीत असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

(टीप : बातमीसोबत वापरण्यात आलेले छायाचित्र हे AI निर्मित काल्पनिक असून, त्याचा प्रत्यक्ष घटनेशी कोणताही संबंध नाही.)

No comments