सामाजिक कार्यकर्ते अनिल वाडीले यांच्या वाढदिवसानिमित्त अंतुर्लीत वृक्षारोपण; ६२ झाडे लावून जगवण्याचा संकल्प अंतुर्ली ता. मुक्ताईनगर : किरण ...
सामाजिक कार्यकर्ते अनिल वाडीले यांच्या वाढदिवसानिमित्त अंतुर्लीत वृक्षारोपण; ६२ झाडे लावून जगवण्याचा संकल्प
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर : किरण धायले
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ वाडीले यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यावेळी वृक्षारोपण करून झाडांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील, औषध निर्माता शेख, दीपक दुट्टे, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, माजी प्राचार्य बी. डी. बारी सर, शेख भैय्या शेख करीम, किरण धायले, भानुदास पाटील तसेच ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनिल भाऊ वाडीले यांनी आपल्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त ६२ झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प केला. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी, अंतुर्ली पोलीस आऊटपोस्ट, पंचमुखी हनुमान मंदिर (बजरंग चौक), विविध मंदिरे, स्मशानभूमी तसेच गावातील अनेक सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे गावकऱ्यांकडून व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच निमित्ताने अंगणवाडीतील लहान बालकांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना बिस्किटांचे वाटप करून वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व जपणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments