यावल महाविद्यालयात ज्ञानेश्वरी देवरे प्रथम भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल - येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहका...
यावल महाविद्यालयात ज्ञानेश्वरी देवरे प्रथम
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल - येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विज्ञान विभागातील रसायनशास्त्र विभागाचा तृतीय वर्ष वर्गाचा निकाल नुकताच लागला. यात प्रथम- कु. ज्ञानेश्वरी महेंद्र देवरे (75.68 %)
द्वितीय -कु. नेहा विनोद महाले (72.18%)
तृतीय- कु. समर्थनी मुकेश येवले (69.38%)
गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
याबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डाँ. एस. आर. गायकवाड, उप प्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. पवार आणि प्रा. आर. एस. शिरसाट यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
श्री मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम, अनिल पाटील, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

No comments