adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुख्यमंत्री कार्यालयाची विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल; जात वैधता प्रमाणपत्राबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला मोठे यश

 मुख्यमंत्री कार्यालयाची विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल; जात वैधता प्रमाणपत्राबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला...

 मुख्यमंत्री कार्यालयाची विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल; जात वैधता प्रमाणपत्राबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला मोठे यश

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा सकारात्मक प्रतिसाद; तातडीने कार्यवाहीची जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांची मागणी

 

 भरत कोळी यावल 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

राज्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेने सुरू केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी ते पाठविल्याचे अधिकृत ई-मेलद्वारे कळविले आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये दिलासा आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देत ही मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे मांडली होती. दरवर्षी प्रवेश प्रक्रिया, व्यावसायिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा तसेच विविध शासकीय भरती प्रक्रियेदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि करिअर धोक्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या उत्तरात निवेदन प्राप्त झाल्याची पुष्टी करण्यात आली असून, आवश्यक त्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे ते पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पुढील पाठपुराव्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या

जात वैधता प्रमाणपत्र निश्चित कालमर्यादेत उपलब्ध करून द्यावे.

प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष मोहीम राबवावी.

शिष्यवृत्ती, प्रवेश व भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची शासनाने हमी घ्यावी.

जिल्हास्तरीय जात पडताळणी समित्यांना आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत करत जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री कार्यालयाने आमच्या निवेदनाची सकारात्मक दखल घेतल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मात्र, केवळ पत्रव्यवहार न राहता संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे. राज्यातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हीच आमची भूमिका असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, करिअर आणि भविष्य सुरक्षित राहावे यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला जाईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले असून, संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन जात वैधता प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त होत आहे.

No comments