जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त अवैध शस्त्रांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त...
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त अवैध शस्त्रांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अवैध शस्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, हुंडाई ईऑन कार आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
दि. २ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, काही इसम कारमधून बेकायदेशीर गावठी कट्टा घेऊन लासूर–चुंचाळे मार्गे चोपड्याकडे येत आहेत. या माहितीची खातरजमा करून एलसीबी व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. पथकाने चोपडा–लासूर–चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी संशयित Hyundai EON (MH-20 EE-6903) कार अडवून तपासणी केली असता एका गावठी कट्ट्यासह दोन मॅगझिन आढळून आले. तसेच आरोपींकडून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.
या कारवाईत सागर रामकृष्ण माळी (वय ३९, रा.कुऱ्हाड खुर्द, ता.पाचोरा,जि. जळगाव), सचिन राजन पवार (वय ३४,रा.मयूर पार्क कॉलनी,गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल केसर साळुंखे (वय ३७,रा.जाधव गल्ली,गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली.त्यांच्याकडून सुमारे ₹६० हजारांचा गावठी कट्टा व मॅगझिन, ₹१० हजारांचे अतिरिक्त मॅगझिन, ₹५ लाखांची Hyundai EON कार आणि ₹३० हजार किमतीचे Oppo, Vivo व Redmi कंपनीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ₹६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.या कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड,पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले तसेच स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. अवैध शस्त्रांच्या तस्करीविरोधात जळगाव पोलिसांची ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले,पोउपनि जितेंद्र वल्टे, पोहकॉ दीपक माळी,पोहकॉ रविंद्र पाटील,पोहकॉ विष्णू बिऱ्हाडे,पोकॉ रावसाहेब पाटील तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सपोनि एकनाथ भिसे, सपोनि युवराज वाळूज,पोकॉ राजेंद्र कोळी,पोकॉ योगेश पाटील,पोकॉ रजनीकांत भास्कर व पोकॉ समा तडवी यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.जळगाव पोलिसांची ही कारवाई अवैध शस्त्र तस्करीविरोधातील महत्त्वाचे यश मानले जात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

No comments