नालासोपारातील महापालिका हॉस्पिटल मध्ये १५०० मोफत सॅनेटरी नॅपकीन भेट..... प्लेज फाउंडेशन व बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक यांचा नाविन्यपूर...
नालासोपारातील महापालिका हॉस्पिटल मध्ये १५०० मोफत सॅनेटरी नॅपकीन भेट.....
प्लेज फाउंडेशन व बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम....
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नालासोपारा ता, १ :- ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काही देण लागतो या सद् भावनेतून हॉस्पिटल मध्ये अॅडमिट असलेल्या महिला, मुली ओपीडी साठी आलेल्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी प्लेज फाऊंडेशन व बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक यांचा वतीने नालासोपारा मधील महापालिकेचा सर्वोदय हॉस्पिटल, नागिनदास हॉस्पिटल, सोपारा हॉस्पिटल मध्ये मोफत १५०० सॅनेटरी नॅपकीन भेट देण्यात आले.
या प्रमुख कार्यक्रमास उपमहापौर मार्शल लोपीस, नगरसेविका सुमन किरण काकडे, नगरसेवक आलमगीर डायर, समाजसेविका सविता कांबळे, शुभांगी धारसे, प्लेज फाउंडेशन चे अँलेक्स डॅनियल उपस्थित होते.
अनेकदा अचानक दाखल झालेल्या रुग्णांकडे किंवा गरजू महिलांकडे हे साहित्य नसते. अशावेळी अनेक महिलांची गैरसोय होते.
हॉस्पिटल मध्ये महिलांसाठी सॅनेटरी पॅड्स असणे अत्यंत गरजेचे असते.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक मुली शाळेत जाणं टाळतात. कारण कित्येक शाळांमध्ये पॅड बदलण्याची सोय नाही किंवा साधनांची उपलब्धता नाही. आता शाळांमधूनही सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशिन्स बसवण्याची सक्ती करणे गरजेचे आहे.
तरी अजूनही सगळ्या शाळांमधून ही सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही.
हेच गांभीर्य ओळखून आज महापालिकेच्या हॉस्पिटल मध्ये मोफत सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात आले. व लवकरच जिल्हा परिषद शाळांमध्येही सेनेटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रूचिता नाईक यांनी सांगितले.


No comments