adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मेलाणे ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी दिलीप पावरा यांची निवड कै. सौ. लालबाई प्रताप पावरा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी स्वीकारली; सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्याचा निर्धार

मेलाणे ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी दिलीप पावरा यांची निवड कै. सौ. लालबाई प्रताप पावरा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी ...

मेलाणे ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी दिलीप पावरा यांची निवड

कै. सौ. लालबाई प्रताप पावरा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी स्वीकारली; सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्याचा निर्धार 


चोपडा | संजीव शिरसाठ

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील मेलाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच कै. सौ. लालबाई प्रताप पावरा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदाची जबाबदारी उपसरपंच दिलीप शंकर पावरा यांच्याकडे प्रभारी सरपंच म्हणून सोपविण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी अधिकृतपणे सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी बोलताना नवनियुक्त प्रभारी सरपंच दिलीप पावरा यांनी, "गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक व सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार," असा विश्वास व्यक्त केला.

सरपंचपदाचे निवडपत्र ग्रामसेवक सौ. राधिकाताई चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नामसिंग पावरा (ग्रामपंचायत सदस्य), अनिल पावरा (ग्रामपंचायत सदस्य), प्रताप पावरा (माजी सरपंच), नामदेव बारेला (ग्रामपंचायत सदस्य) तसेच प्रेमसिंग (वायरमन) आदी उपस्थित होते.

नवनियुक्त प्रभारी सरपंच दिलीप पावरा यांचे पत्रकार तथा आदिवासी समाजसेवक संजीव शिरसाठ, पत्रकार हेमंत गायकवाड, दत्ताभाऊ पावरा (सरपंच, वैजापूर), तारासी पावरा (ग्रामपंचायत सदस्या), देवसिंग पावरा (पोलीस पाटील, उनपदेव), गणदास बारेला (पोलीस पाटील), ताराचंद पावरा (पोलीस पाटील, ताराघाटी), आमाश्या पावरा (पोलीस पाटील, खैऱ्यापाणी) तसेच मोहन बारेला (प्रतिनिधी, क्राईम बुलेट न्यूज) यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments