adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासूरच्या विशाल सपकाळेचा 'व्हॉइस ऑफ नंदुरबार – सीझन ६' स्पर्धेत प्रथम क्रमांक उत्कृष्ट गायनाची छाप; ₹१५ हजारांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राने गौरव

लासूरच्या विशाल सपकाळेचा 'व्हॉइस ऑफ नंदुरबार – सीझन ६' स्पर्धेत प्रथम क्रमांक उत्कृष्ट गायनाची छाप; ₹१५ हजारांचे रोख पारितोषिक, स्मृ...

लासूरच्या विशाल सपकाळेचा 'व्हॉइस ऑफ नंदुरबार – सीझन ६' स्पर्धेत प्रथम क्रमांक

उत्कृष्ट गायनाची छाप; ₹१५ हजारांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राने गौरव 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित 'व्हॉइस ऑफ नंदुरबार – सीझन ६' कराओके गीत गायन स्पर्धा २०२६ मध्ये लासूर येथील विशाल सपकाळे यांनी आपल्या सुरेल व प्रभावी गायनाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

दि. १२ जुलै २०२६ रोजी नंदुरबार येथे पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक गुणी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत विशाल सपकाळे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत परीक्षकांची आणि उपस्थित रसिकांची मने जिंकली व प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.

या यशाबद्दल नंदुरबारचे माजी आमदार चंदुभैय्या रघुवंशी यांच्या हस्ते विशाल सपकाळे यांचा ₹१५ हजारांचे रोख पारितोषिक, संगीत साहित्य, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

विशाल सपकाळे हे लासूर येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक जी. एस. सपकाळे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे लासूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, गावासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विशाल सपकाळे यांच्या या यशामुळे संगीत क्षेत्रात त्यांची नवी ओळख निर्माण झाली असून, त्यांच्या भावी संगीत कारकिर्दीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments