adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शस्त्रांसह दोघ अटकेत: एक फरार रावेर मध्ये दरोडा टाकण्यापुर्वीच आरोपी रावेर पोलिसांच्या कचाट्यात!

  शस्त्रांसह दोघ अटकेत: एक फरार रावेर मध्ये दरोडा टाकण्यापुर्वीच आरोपी रावेर पोलिसांच्या कचाट्यात!  मुबारक तडवी रावेर  (संपादक : हेमकांत गाय...

 शस्त्रांसह दोघ अटकेत: एक फरार रावेर मध्ये दरोडा टाकण्यापुर्वीच आरोपी रावेर पोलिसांच्या कचाट्यात! 


मुबारक तडवी रावेर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

 शस्त्रे, मिरची पावडर व इतर साहित्यासह रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित इसमांना रावेर पोलीसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून या तीघांमधील एक साथीदार फरार झाला आहे.सदरची कारवाई रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली. सविस्तर असे की दि.१० जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक ईश्वर चव्हाण हे पाल दुरक्षेत्र येथे कर्तव्यावर असताना, पाल गावातील एका पांढऱ्या रंगाच्या इको चारचाकी वाहनातून पाच ते सहा इसम संशयास्पदरीत्या फिरत असून ते वाहन रावेर शहराकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार रावेर पोलिसांनी पालकडून रावेरकडे येणाऱ्या मार्गावर सापळा रचला.

आभोडा गावाजवळ संशयित वाहन दिसताच ते थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाहनचालकाने वेगाने पळ काढत रावेर शहराच्या दिशेने भरधाव वेगाने ही कार रावेर च्या आठवडे बाजार परिसरातून बुर्हाणपूर रस्त्या गाठून पळण्याचा प्रयत्न करत असताना पुलाजवळील डबक्यात चिखलात अडकले. या चारचाकी वाहनाचा पोलीस व १५ ते २० जणांचा जमाव व  पाठलाग करत होता. वाहन अडकल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोन पोलीसांच्या कचाट्यात सापडले त्यातील इतर इसम पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींना पकडताना जमावाने त्यांच्या वर हल्ला करून त्यांना जखमी केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी जखमींना जमावातून सोडवून रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) (५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५

अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून चौकशी केली असता ते कोणतीही ठोस माहिती देत नसून उडवाउडवीची उत्तरे देत होते. वाहनाची तपासणी केली असता त्यातून एक लोखंडी तलवार, पेचीस, टॉमी, लाल मिरची पावडर, दोरखंड, ५०० रुपये रोख तसेच सुमारे तीन लाख रुपये किमतीची बनावट बँकेच्या नोटांचे बंडल, एमएच-१९-ईए-२४०३ क्रमांकाची सुझुकी कंपनीची इको कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात हे आरोपी रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी इतर साथीदारांची माहिती पोलिसांना दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण पाटील (वय २०) आणि अल्ताफ जलाल शेख (वय २६, रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासारवडवली, जि. ठाणे) यांचा समावेश आहे. तर मेहताब जहांगीर तडवी (रा. पाल) हा फरार असून त्याच्यासोबतचे अन्य दोन साथीदारांची नावे व गावाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. आरोपी कोणते गुन्हे करणार होते आणि त्यांच्यासोबत आणखी कोण सहभागी होते, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील समाधान ठाकूर, ईश्वर चव्हाण, सुनील वंजारी, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, संतोष इदा आदींनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

No comments