adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दगडावर साकारले 'मूल्यवर्धन'; मानव सेवा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सृजनशीलतेला अनोखा वाव

 दगडावर साकारले 'मूल्यवर्धन'; मानव सेवा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सृजनशीलतेला अनोखा वाव जळगाव  प्रतिनिधी (संपादक: हेमकांत गायकवा...

 दगडावर साकारले 'मूल्यवर्धन'; मानव सेवा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सृजनशीलतेला अनोखा वाव


जळगाव  प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

मानव सेवा विद्यालय, जळगाव येथे उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली "दगडावर चित्रांकन" हा नाविन्यपूर्ण मूल्यवर्धन उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच सृजनशीलता, सौंदर्यदृष्टी आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

उपक्रमादरम्यान कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी दगडावर आकर्षक अक्षरशैलीत "मूल्यवर्धन" हा शब्द तसेच सुंदर लोगो रेखाटून विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी कलाकृती साकारली. त्यांच्या प्रात्यक्षिकातून प्रेरणा घेत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनीही दगडांवर "मूल्यवर्धन" हे नाव कल्पकतेने व कलात्मक पद्धतीने रेखाटले. रंगसंगती, अक्षररचना आणि कलात्मक मांडणीचा उत्कृष्ट वापर करत विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता प्रभावीपणे सादर केली. 


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला, सृजनशीलता, सौंदर्यदृष्टी, संयम, कल्पकता आणि आत्मविश्वास यांचा विकास होण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे उपस्थित शिक्षकांनी मनापासून कौतुक केले.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळते, असे सांगितले. तसेच बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. मुक्ता पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया व मानद सचिव विश्वनाथ जोशी यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कला, मूल्यसंवर्धन आणि आत्मविश्वासाची जडणघडण होते, असे सांगून कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्या उपक्रमशील कार्याचे विशेष अभिनंदन केले.

या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. शालेय जीवनात अशा नाविन्यपूर्ण व कृतीशील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

No comments