adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"प्रतिमा विराजमान झाली का नाही?; नगर परिषदेकडे लेखी उत्तराची मागणी" आंबेडकरांच्या प्रतिमेचे काय झाले? निलंगा नगर परिषदेकडे वंचित बहुजन महिला आघाडीचा जाब

"प्रतिमा विराजमान झाली का नाही?;  नगर परिषदेकडे लेखी उत्तराची मागणी" डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे काय झाले? निलंगा नगर परि...

"प्रतिमा विराजमान झाली का नाही?;  नगर परिषदेकडे लेखी उत्तराची मागणी"

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे काय झाले? निलंगा नगर परिषदेकडे वंचित बहुजन महिला आघाडीचा जाब


लातूर  प्रतिनिधी (उत्तम माने)

(संपादक -:-  हेमकांत गायकवाड)

नगर परिषद, निलंगा कार्यालयात शासकीय प्रोटोकॉलनुसार सन्मानपूर्वक विराजमान करण्यासाठी देण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नेमके काय झाले, असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन महिला आघाडीने प्रतिमा विराजमान झाल्याचा अधिकृत पुरावा सादर करावा, अन्यथा ती प्रतिमा सन्मानपूर्वक परत करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. मंजू हिरालाल निंबाळकर, तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी तसेच डॉ. हिरालाल गणपतराव निंबाळकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी नगराध्यक्ष संजयराज हलगरकर उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने स्वतःच्या खर्चातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नगर परिषद कार्यालयात शासकीय प्रोटोकॉलनुसार सन्मानपूर्वक विराजमान करण्यासाठी देण्यात आली होती. सदर प्रतिमा कार्यालयात विराजमान करण्यात आली असल्यास त्याचे छायाचित्र अथवा अन्य अधिकृत पुरावे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, प्रतिमा अद्याप विराजमान करण्यात आली नसल्यास त्यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावीत. सक्षम प्राधिकाऱ्याच्या निर्णयानुसार प्रतिमा बसविणे शक्य नसल्यास, संबंधित प्रतिमा सन्मानपूर्वक परत करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणी नियमानुसार तातडीने लेखी उत्तर द्यावे, अन्यथा माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ तसेच इतर उपलब्ध वैधानिक तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, या संदर्भात निलंगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी लोमटे यांची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त लिहिपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.

No comments