adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

'AHTU' ची थरारक कामगिरी..! "६ वर्षांपासून गायब असलेल्या मुलीचा लावला शोध

 'AHTU' ची थरारक कामगिरी..! "६ वर्षांपासून गायब असलेल्या मुलीचा  लावला शोध   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 'AHTU' ची थरारक कामगिरी..! "६ वर्षांपासून गायब असलेल्या मुलीचा  लावला शोध  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- ६ वर्षांपूर्वी फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात अहिल्यानगर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTU) अत्यंत मोठे यश आले आहे.दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,१४ सप्टेंबर २०२२ रोजी आरोपी खंडू गहीनाथ पालवे (रा.मोहरी, ता. पाथर्डी,जि.अहिल्यानगर) याने एका अल्पवयीन मुलीला मोहरी गावातून फूस लावून पळवून नेले होते.याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८९६/२०२२, भादंवि कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीर्घकाळ या गुन्ह्याचा तपास लागू शकला नव्हता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) अहिल्यानगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला.तपासा दरम्यान गुन्ह्यात भादंवि कलम ३७० हे वाढीव कलम लावण्यात आले होते.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे करत होते.​तपास चक्रादरम्यान पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी वेगवेगळ्या मार्गांनी आणि अत्यंत गोपनीय पद्धतीने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा केली.अखेर ११ जुलै २०२६ रोजी सदर अपहृत मुलगी मिळून आली.तिला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाथर्डी पोलीस स्टेशन हजर करण्यात आले आहे.सदरची कौतुकास्पद कामगिरी श्री.मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री.गणेश उगले  पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे,सफौ/शकील शेख,पोहेकॉ/  समीर सय्यद,मपोहेकॉ /अर्चना काळे,मपोकॉ/छाया रांधवण सर्व नेमणूक - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष,अहिल्यानगर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments