निराधार विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर वाटप जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मध्ये दानशूरांच्या मदतीने सामाजिक उपक्रम प्रा सतिश गायकवाड मुक्ता...
निराधार विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर वाटप
जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मध्ये दानशूरांच्या मदतीने सामाजिक उपक्रम
प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत येथील नामवंत शाळेत आज निराधार व गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि दप्तर वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम ज्येष्ठ शिक्षक एस. एम. वाढे सर यांच्या पुढाकाराने पार पडला. दाते प्रमोद हरी भारंबे, मुक्ताईनगर आणि मिलिंद पाटील मुंबई या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या मदतीसाठी आर्थिक सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला एस.आर. ठाकूर सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षण हे सर्वांसाठी समान असावे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा यामागचा मुख्य उद्देश स्पष्ट करून दिला.
त्यानंतर उपस्थित मान्यवर प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही. के. शिर्के आणि पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे ,के आर कवळे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य व्ही. एम.चौधरी यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी शाळेने नेहमीच परवानगी आणि प्रेरणा दिली आहे.शिक्षकांनी पुढाकार घेऊन समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.अशा शब्दात
वाढे सरांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तर प्राचार्यांच्या प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळेच हा उपक्रम यशस्वी झाल्याचे मत व्यक्त करीत वाढे सरांनी त्यांचे आभार मानले.या उपक्रमामुळे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून. दात्यांचे या सहकार्याबद्दल सर्वांनी आभार मानले.मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा होता.सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.

No comments