अभिष्टचिंतन समाजहितासाठी सदैव कार्यरत असलेले अनिल भाऊ वाडीले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सामाजिक बांधिलकी, साधी राहणी, विनम्र ...
अभिष्टचिंतन
समाजहितासाठी सदैव कार्यरत असलेले अनिल भाऊ वाडीले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
सामाजिक बांधिलकी, साधी राहणी, विनम्र स्वभाव आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली तळमळ या गुणांमुळे परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अनिल भाऊ वाडीले यांचा दि. १७ जुलै रोजी ६२ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांना मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा.
उच्चशिक्षित, प्रगतशील शेतकरी, विचारवंत, दिलदार, शांत, संयमी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून अनिल भाऊ सर्वपरिचित आहेत. प्रत्येकाशी आपुलकीने व समतेने वागण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख आहे. श्री संत मुक्ताबाई यांचे आशीर्वाद, तसेच माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे मार्गदर्शन आणि आई-वडील एस. ए. भोई सर यांनी दिलेले उत्तम संस्कार यांच्या बळावर त्यांनी समाजसेवेचा वसा जपला आहे.
विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. विजेच्या समस्या, विविध शासकीय योजनांचे लाभ, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे, नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पीक विमा, एसटी बस सेवा, आरोग्य सुविधा, गटार व पिण्याच्या पाण्याच्या समस्या, गावात सीसीटीव्ही बसविणे अशा अनेक विषयांवर त्यांनी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.
याशिवाय समाजोपयोगी उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. रोगनिदान शिबिरे, नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरे, जनजागृती मोहिमा, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'कृतज्ञता पुरस्कार' देऊन सन्मानित करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
समाजहिताची जाणीव, विकासाची दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे अनिल भाऊ यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी ईश्वराने भरभरून शक्ती द्यावी, हीच प्रभू चरणी प्रार्थना.
वाढदिवसानिमित्त अनिल भाऊ वाडीले यांना हार्दिक शुभेच्छा!
शब्दांकन :
किरण धायले, अंतुर्ली


No comments