योजनेच्या कामात वीज चोरीचा आरोप; संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांचे मुख्य अभियंत्यांना निवेदन ...
योजनेच्या कामात वीज चोरीचा आरोप; संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांचे मुख्य अभियंत्यांना निवेदन
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुख्यमंत्री अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये वीज चोरी होत असल्याचा आरोप करत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी महावितरणचे मुख्य अभियंता, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अमृत योजनेची कामे सुरू असताना अधिकृत वीजजोडणी न घेता वीज वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधितांकडून वीज चोरी होत असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
केदारनाथ सानप यांनी या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच झालेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशीही मागणी आपल्या निवेदनातून केली आहे.
(टीप : हे वृत्त माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दिलेल्या लेखी निवेदनावर आधारित असून, संबंधित प्रकरणी महावितरण किंवा इतर संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही.)

No comments