सावदा सपोनि गणेश फड यांची अतिक्रमण निर्मूलन गस्त बेशिस्त वाहतूक वाहनधारकांना सक्त ताकीद! सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत...
सावदा सपोनि गणेश फड यांची अतिक्रमण निर्मूलन गस्त
बेशिस्त वाहतूक वाहनधारकांना सक्त ताकीद!
सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड, उपनिरीक्षक राहुल सानप यांनी आज पासून शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था अतिक्रमण धारक व मुख्य रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणारे हातगाडी धारक फळफ्रुट विक्रेते यांना आज पासून पुर्वसुचना देत रस्त्यावरील अतिक्रमण विरोधात कारवाई चा बडगा उगारला जाणार असल्याचे सुचित केले व रहदारीस अडथळा निर्माण न करण्याच्या दुकानदार व्यावसायिक यांना सुचना दिल्या या पुढे बेशिस्त पणा खपवून घेतला जाणार नाही जो कोणी नियम कायदा मोडेल त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी पोलीस स्टेशनचे
अंमलदार कर्मचाऱ्यांसह सावदा शहरात पायी पेट्रोलिंग करून बेशिस्त अतिक्रमण धारकांना रहधारीस अडथळा निर्माण न करणे बाबत सूचना दिल्या व रस्त्यावर असलेले फलक व लोटगाड्या हटविण्यात आल्या यावेळी सपोनि गणेश फड उपनिरीक्षक राहुल सानप पो हे कॉ निलेश बावस्कर, सावदा टाऊनचे पो हे कॉ उमेश पाटील, गोपनीय शाखेचे पो हे कॉ राजेंद्र बोदडे पो कॉ मयुर पाटील याचेसह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी कारवाई केली


No comments