जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक १, चोपडा येथे विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा, दि. ८ ज...
जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक १, चोपडा येथे विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा, दि. ८ जुलै २०२५ : जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक १, चोपडा (जि. जळगाव) येथे आज विद्यार्थिनींसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक अब्दुल सरदार पटेल यांच्या सौजन्याने शाळेतील २०० विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद सफर सय्यद हनीफ हे प्रमुख उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


No comments