adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ₹४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त; अडावद पोलिसांत गुन्हा दाखल

चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ₹४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त; अडावद पोलिसांत गुन्हा दाखल  अडावद प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड...

चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ₹४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त; अडावद पोलिसांत गुन्हा दाखल 


अडावद प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

चोपडा तालुक्यातील वडगाव गावाजवळ अवैधरित्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.28 जुलै 2026) सायंकाळी करण्यात आली. या प्रकरणी वैभव बाविस्कर,नेम चोपडा ग्रामीण पो स्टे प्रतिनियुक्ती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,चोपडा यांनी ता.चोपडा अडावद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार,छोटे बाबुराव पाटील (वय 51,रा.वडगाव, ता. चोपडा) यांनी शासनाची परवानगी नसताना अवैधरित्या वाळूची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. कारवाईदरम्यान MH-19 CU 5540 क्रमांकाचा निळ्या रंगाचा 744 एफ.एम. ट्रॅक्टर, त्यास जोडलेली ट्रॉली आणि त्यामध्ये भरलेली सुमारे 3 ब्रास वाळू असा एकूण ₹4,07,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मधुकर खंडारे (प्रभारी अधिकारी, अडावद पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अनवर तडवी, अडावद पोलीस स्टेशन हे करीत आहेत.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू ठेवली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

No comments