adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धानोरा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ₹३.०७ लाखांचा ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू जप्त अज्ञात आरोपीविरुद्ध अडावद पोलिसांत गुन्हा दाखल; चालक घटनास्थळावरून फरार

  धानोरा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ₹3.07 लाखांचा ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू जप्त अज्ञात आरोपीविरुद्ध अडावद पोलिसांत गुन्हा दाखल; चालक घट...

 धानोरा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ₹3.07 लाखांचा ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू जप्त

अज्ञात आरोपीविरुद्ध अडावद पोलिसांत गुन्हा दाखल; चालक घटनास्थळावरून फरार 


अडावद  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील धानोरा गावाजवळील पारगाव फाट्यानजीक अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 302(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ₹3,07,500 किमतीचा ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय बच्छाव, अडावद पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.29 जुलै 2026) सकाळी सुमारे 08.30 वाजण्याच्या दरम्यान धानोरा गावाजवळील पारगाव फाट्यानजीक गस्तीदरम्यान एक हिरव्या रंगाचा क्रमांक नसलेला जॉन डिअर 5107 ट्रॅक्टर व त्यास जोडलेली क्रमांक नसलेली ट्रॉली संशयास्पदरीत्या आढळून आली. ट्रॉलीमध्ये सुमारे दीड ब्रास वाळू भरलेली होती. पोलिसांची चाहूल लागताच चालक ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून फरार झाला.

या कारवाईत ₹3,00,000 किमतीचा जॉन डिअर 5107 ट्रॅक्टर, ₹7,500 किमतीची वाळू असा एकूण ₹3,07,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मधुकर खंडारे, प्रभारी अधिकारी, अडावद पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार जितेंद्र सोनवणे, अडावद पोलीस स्टेशन हे करीत आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात अडावद पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

No comments