adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांच साकळी जिल्हा परिषद शाळेला भेट विद्यार्थ्यांची साधला संवाद, शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले

  राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांच साकळी जिल्हा परिषद  शाळेला भेट विद्यार्थ्यांची साधला संवाद, शालेय कामकाजाब...

 राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांच साकळी जिल्हा परिषद  शाळेला भेट

विद्यार्थ्यांची साधला संवाद, शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल :- महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार वसंतराव महाजन  यांनी दि.२० जुलै रोजी साकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुला -मुलींची शाळांमध्ये स्नेह भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.विद्यार्थ्यांचा वाचन,लिखाण व इतर गुणवत्तापूर्वक कौशल्यांच्या शाळेतील शैक्षणिक वातावरणाचा आढावा घेतला. प्रभावी व गुणवत्तापूर्ण कामकाजासाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील पिण्याचे पाण्याची सुविधा,शाळेची इमारत,शैक्षणिक भौतिक सुविधा,शालेय पोषण आहार व किचन यासह शाळेतील शाळेतील सोयी- सुविधांची पाहणी केली आणि कामकाजात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.शालेय परिसरात साफसफाई बाबत सूचना केल्या. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा,विविध शालेय स्पर्धा,उपक्रम यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.एकूणच शाळेतील कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.शाळेच्या वतीने महाजन साहेबांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या भेटी प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सरोज पाटील मॅडम,यावल तालुका मूल्यवर्धक समन्वयक रवींद्र पाटील ,साकळीचे  केंद्रप्रमुख शेख महबूब तडवी, विषय शिक्षका भास्कर पाटील, मुख्याध्यापक मोहन पिंगळे उपस्थित होते.उपसचिव तुषार महाजन आपल्या गावातील शाळेला दिलेली भेट खूप महत्त्वाची व शाळेच्या विकासाच्या दृष्टीने पुरक ठरली आहे.

No comments