adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांना अभिवादन; इंदिरा गांधी विद्यालयात ६७ वी जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी"

 "लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांना अभिवादन; इंदिरा गांधी विद्यालयात ६७ वी जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी"  धरणगाव प...

 "लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांना अभिवादन; इंदिरा गांधी विद्यालयात ६७ वी जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी" 


धरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात कृतज्ञता, प्रेरणा आणि आदरभाव व्यक्त करणारा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदर्श विद्यालयाचे संचालक व शिक्षक आशिषकुमार पाटील यांच्या शुभहस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षीका भारती पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे तसेच इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ए. एस. पाटील उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, शिक्षण, समाजसेवा आणि जनकल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना जोपासण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक डी. एन. पाटील यांनी मानले. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्याचा आणि समाजहिताची वाट अधिक सक्षमपणे चालण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.

No comments