आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा जयघोष चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा - श्रीराम नगर येथे श्री संताजी जगनाडे महाराज ...
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा जयघोष
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा - श्रीराम नगर येथे श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखूमाईच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष के. डी. चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत करून विठ्ठल रखू माईच्या प्रतिमेला हार अर्पण केला. आरती करून विठ्ठल नामाचा व संताजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी नेरकर आप्पा, राजेंद्र गणपत चौधरी, श्रीराम मिस्त्री, देवकांत के चौधरी आदी भाविकांची उपस्थिति लाभली.

No comments