adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची ग्रामीण एरिया साठी जळगाव जिल्हा परिषदेवर धडक.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची ग्रामीण एरिया साठी जळगाव जिल्हा परिषदेवर धडक.   ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात मनसेचा इशारा; म...

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची ग्रामीण एरिया साठी जळगाव जिल्हा परिषदेवर धडक.  

ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात मनसेचा इशारा; मागण्या न मानल्यास तीव्र लोकशाही आंदोलनाचा इशारा 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नंदगाव (फेसर्डी) अंतर्गत येणाऱ्या फेसर्डी गावातील मूलभूत सुविधांचा अभाव, ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराची चौकशी करून तातडीने विकासकामे हाती घेण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

सुमारे ५५० लोकसंख्या असलेल्या फेसर्डी गावात शासनाच्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध होत असतानाही गाव विकासापासून वंचित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे मनसेने म्हटले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, गावातील अनेक भागांमध्ये गटारीच नसून ज्या गटारी आहेत त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. भूमिगत गटार व्यवस्था चोकअप झाल्याने सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहत असून दुर्गंधी, डास व साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. गावात प्रवेश करताना रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री अपघात व गुन्हे घडण्याची शक्यता वाढली आहे.

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्ययात्रेलाही अडचणींचा सामना करावा लागत असून त्याच मार्गावर कचरा डेपो असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील मुलांसाठी खेळाचे मैदान नसणे, युवकांसाठी व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध न करणे, मारुती मंदिर परिसराची अस्वच्छता, गटारींची नियमित साफसफाई न होणे, बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे, अपूर्ण शाळा कंपाऊंड आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव यासह अनेक गंभीर समस्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, आजही गावातील महिला व माता-भगिनींना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे. तसेच गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे विकासकामांवर प्रभावी नियंत्रण राहत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मनसे शेतकरी सेनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे फेसर्डी गावाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याची, सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची, गटार, रस्ते, स्ट्रीट लाईट, स्मशानभूमी रस्ता, सार्वजनिक स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, व्यायामशाळा, शाळेचे कंपाऊंड आदी सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे, पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नियुक्त करणे आणि विकासकामांसाठी मंजूर निधी व खर्चाची चौकशी करून दोषींवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास गावकऱ्यांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पाटील, संजय मोती, हेमंत कोळी, शैलेश चौधरी, सुनील साळुंखे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे यांच्यासह मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व ठाकरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments