निंभोरा येथे पेव्हरब्लॉकमुळे मोहम्मदी नगरच्या सौंदर्यात भर _अल्पसंख्यांक विकास निधीतून १० लाखांचे रस्ता काम पूर्ण! रावेर प्रतिनिधी मुबारक ...
निंभोरा येथे पेव्हरब्लॉकमुळे मोहम्मदी नगरच्या सौंदर्यात भर
_अल्पसंख्यांक विकास निधीतून १० लाखांचे रस्ता काम पूर्ण!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथील वार्ड क्र. 6 मधील मोहम्मदी नगर मशिद गल्लीला अखेर सुंदर आणि दर्जेदार रस्ता मिळाला आहे. अल्पसंख्यांक विकास योजनेतून सुमारे 10 लाख रुपये खर्चून करण्यात आलेले पेव्हरब्लॉकचे बहुप्रतीक्षित काम पूर्ण झाल्याने परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे. राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले. मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.
श्रीफळ वाढवून शुभारंभ
कामाचा शुभारंभ माजी पं.स. सदस्य दीपक पाटील आणि विवेक ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुनंदा मधुकर बिऱ्हाडे, सौ. शाहीन दस्तगीर खाटीक, स्वप्निल गिरडे, राजीव बोरसे, केळी व्यापारी रमजू पटेल, युनूस अमन खान, संदीप महाले , मुजफ्फर पटेल,तोकिर शेख,अजहर खान,असद शेख कुट्टीवाले, इम्रान पटेल, अशपाक पटेल सर, आलम पटेल,आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण काम, नागरिक समाधानी
सदर पेव्हरब्लॉक रस्त्याचे साईटपट्टी आणि कारपेटचे काम सर्व नियम व दर्जाच्या निकषांना अनुसरून करण्यात आले आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे त्रस्त असणाऱ्या मोहम्मदी नगरमधील नागरिकांना आता स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर रस्ता उपलब्ध झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी दीपक पाटील व ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले असून, "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या रस्त्याची वाट पाहत होतो. आता गल्लीचे रूपच पालटले आहे" अशी समाधानाची भावना व्यक्त केली. मोहम्मदी नगरसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात पायाभूत सुविधांसोबतच सौंदर्यवृद्धी झाल्याने परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळाला आहे.


No comments