लोणवडी गावातील निंबादेवी मंदिरात चोरी; गावकऱ्यांच्या वतीने मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे निवेदन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेम...
लोणवडी गावातील निंबादेवी मंदिरात चोरी; गावकऱ्यांच्या वतीने मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे निवेदन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लोणवडी येथील श्री निंबादेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून देवीचा अंदाजे ६५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावातील भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून धर्मवीर यूथ फाउंडेशन,व ग्रामस्थ लोणवडी यांच्या वतीने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. निवेदनात घटनेचा तातडीने तपास करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर पंकज बन्हाटे, घनश्याम वराडे, धनंजय पाटील, शुभम खरचे, देवा बावस्कर (अध्यक्ष, धर्मवीर यूथ फाउंडेशन, लोणवडी), मयूर बन्हाटे (उपाध्यक्ष), आदित्य पाटील, प्रवीण पाटील, सागर दोडे, सागर पाटील आणि प्रसाद वराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments