चक्रधर शिक्षण मंडळ संचालित ; प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये पालक शिक्षक सभा संपन्न, विद्यार्थी व पालकांची भव्य उपस्थिती रावेर प्रति...
चक्रधर शिक्षण मंडळ संचालित ; प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये पालक शिक्षक सभा संपन्न, विद्यार्थी व पालकांची भव्य उपस्थिती
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील चक्रधर शिक्षण मंडळ संचालित प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये आज दि.17 जुलै शुक्रवार रोजी प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या सभागृहात पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांचे पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले
या सभेचे अध्यक्षस्थान श्री. दीपक तुकाराम चौधरी यांनी भूषविले, सभेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक प्रगती बाबत विचारविनिमय व सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवण्याबाबतचे निर्माण घेण्यात आले. या पालक शिक्षक सभेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व्ही एस महाजन सर ,पर्यवेक्षक राजेश बडगुजर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, सभेचे सूत्रसंचालन श्री. बी. टी. सपकाळे सर यांनी केले तर आभार श्री. जे. आर .पाटील सर यांनी मानले.

No comments