adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रग्स तस्करांच्या मुसक्या आवळल्या!सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची मोठी कारवाई;अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रग्स तस्करांच्या मुसक्या आवळल्या!सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची मोठी कारवाई;अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त  सचि...

 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रग्स तस्करांच्या मुसक्या आवळल्या!सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची मोठी कारवाई;अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर/​श्रीरामपूर (प्रतिनिधी):-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीरामपूर आणि परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्करांविरुद्ध पोलिसांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई करत एका कुख्यात एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ तस्कराला रंगेहात अटक केली.या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ५२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून,या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.​अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.​त्याच वेळी अस्तगाव फाटा (नांदूर शिवार) येथे एक जण पांढऱ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवर एम.डी.ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या पथकाला मिळाली.

​अस्तगाव फाट्यावर पोलिसांचा छापा

​माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना लेखी रिपोर्ट दिला.त्यानंतर श्रीरामपूर पोलिसांचे सपोनि राम शिखरे,महिला पोलीस अंमलदार मीरा सरग यांच्यासह संयुक्त पथकाने शासकीय वाहनाने अस्तगाव फाटा गाठले. तेथे संशयास्पदरीत्या थांबलेल्या तरुणावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अचानक झडप घातली.

​पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपले नाव सोहेल जुबेर शेख (वय २७, रा. मिल्लतनगर, वार्ड नं. २, श्रीरामपूर) असल्याचे सांगितले.​​पोलिसांनी सोहेल शेख याची आणि त्याच्या मोपेड गाडीची कसून झडती घेतली.त्यावेळी त्याच्याकडे एका प्लास्टिक पाऊचमध्ये तीव्र उग्र वास येणारा पदार्थ आढळला.पोलिसी खाक्या दाखवताच तो पदार्थ 'एम.डी.' (मेफेड्रोन) नावाचा घातक अंमली पदार्थ असल्याची कबुली आरोपीने दिली.​पोलिसांनी आरोपी सोहेल शेख याच्याकडून ​एम.डी.अंमली पदार्थ: ९६,६०० रुपये किमतीचा (४.८३ मिलीग्रॅम)

​रोख रक्कम: ६,२०० रुपये

​मोबाईल: ५०,००० रुपये किमतीचा स्मार्टफोन

​मोपेड मोटारसायकल: १,००,००० रुपये किमतीची दुचाकी ​एकूण २,५२,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.​आरोपीकडे या ड्रग्जच्या स्त्रोताबाबत सखोल चौकशी केली असता,त्याने हा माल आसिफ मुनीर शेख (रा. बेलापूर,ता.श्रीरामपूर) याच्याकडून आणल्याचे कबूल केले.सध्या आरोपी आसिफ शेख हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

​गुन्हा दाखल व पुढील तपास

​याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६९८/२०२६ नुसार एनडीपीएस (NDPS) कायदा १९८५ चे कलम ८(क), २१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे कुठेपर्यंत पसरली आहेत,याचा पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत.​सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.संतोष मुटकुळे, पोनि.विशाल खैरे,पोउपनि. अनंत सालगुडे,सपोनि.राम शिखरे,पोलीस अंमलदार अतुल लोटके,बिरप्पा करमल, रिचर्ड गायकवाड,शामसुंदर जाधव,रमिजराजा आतार, विशाल तनपुरे,मीरा सरग आणि चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.


No comments