adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे आदिवासी कोळी जमातीची १७ जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक

 यावल येथे आदिवासी कोळी जमातीची १७ जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक   भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल (ता. यावल) : ९ ऑगस्ट रोजी ...

 यावल येथे आदिवासी कोळी जमातीची १७ जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक

 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मनवेल (ता. यावल) : ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या नियोजनासाठी यावल येथील शेतकी संघाच्या सभागृहात आदिवासी कोळी समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा आदिवासी कोळी जमातीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. बैठकीमध्ये जिल्हाभरातील आदिवासी कोळी समाजाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत. यावेळी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या उत्सवाचे नियोजन, विविध जबाबदाऱ्यांचे वाटप, कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करणे तसेच उत्सव समितीची घोषणा या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस आदिवासी कोळी समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments