adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आषाढी एकादशीनिमित्त अंतुर्ली येथे फराळ वाटप; अनिल कापसे यांचा स्तुत्य उपक्रम

आषाढी एकादशीनिमित्त अंतुर्ली येथे फराळ वाटप; अनिल कापसे यांचा स्तुत्य उपक्रम  अंतुर्ली : किरण धायले संपादक हेमकांत गायकवाड  आषाढी एकादशीच्या...

आषाढी एकादशीनिमित्त अंतुर्ली येथे फराळ वाटप; अनिल कापसे यांचा स्तुत्य उपक्रम 


अंतुर्ली : किरण धायले

संपादक हेमकांत गायकवाड 

आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक व ग्रामस्थांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. हा सामाजिक उपक्रम अनिल निंबाजी कापसे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. बसस्थानक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या फराळ वाटप कार्यक्रमात गावातील नागरिक, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच वारकरी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी दीपक बारी, राजू कोळी व त्यांच्या मित्रपरिवाराने फराळ वाटपासाठी मोलाचे सहकार्य केले. अनिल कापसे हे दरवर्षी आषाढी एकादशी तसेच महाशिवरात्रीच्या निमित्तानेही फराळ वाटपाचा उपक्रम राबवत असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. बसस्थानकासह बजरंग चौक आणि चावडी परिसरातही भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने समाजात सेवा, सहकार्य आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत करणारा हा उपक्रम अंतुर्ली गावासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

No comments