अनैतिक संबंधांच्या संशयातून मित्राची हत्या; रावेर पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकव...
अनैतिक संबंधांच्या संशयातून मित्राची हत्या; रावेर पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रावेर तालुक्यातील व्यकीने आपल्या साथीदाराच्या मदतीने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यातील नांदुर खेडा शेतशिवारात घडल्यानंतर खळबळ उडाली आहे
रावेर पोलिसांनी २४ तासांतच या खुन प्रकरणाचा तपास करत दोन आरोपी अटक केले आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि मुख्य आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. आरोपीला आपल्या पत्नीचे मृत व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे पर्यवसान अखेर मित्राच्या हत्येत झाले. आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने मित्राचा खून केला. रावेर तालुक्यात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यकीने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेचा तपशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि मुख्य आरोपी हे एकमेकांचे परिचित व मित्र होते. आरोपीला आपल्या पत्नीचे मृत व्यकीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे पर्यवसान अखेर मृत्यूवर झाले. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वासा न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीलाच महत्त्व देण्याचे आवाहन केले आहे.

No comments