adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महात्मा फुलेंचा समता आणि बंधुत्वाचा वारसा जपा - कुलगुरू डॉ. विलास खर्चे

 महात्मा फुलेंचा समता आणि बंधुत्वाचा वारसा जपा - कुलगुरू डॉ. विलास खर्चे  जावेद शेख / राहूरी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महात्मा फुले यांचा...

 महात्मा फुलेंचा समता आणि बंधुत्वाचा वारसा जपा - कुलगुरू डॉ. विलास खर्चे 


जावेद शेख / राहूरी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महात्मा फुले यांचा समता, बंधुता आणि सत्यशोधनाचा वारसा जपा. शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला कृषि तंत्रज्ञान अवगत करून द्यावे तसेच शेतकरी समृद्धीसाठी सतत कार्यरत रहा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आयोजित समता दौडमध्ये सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना संबोधित करताना कुलगुरू बोलत होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त समता दौड आयोजित करण्यात आली होती.

सुरूवातीला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी सहभागी विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रबोधन केले व दौड सुरू झाली. अभियांत्रिकी महाविद्यालय ते सावित्रीबाई फुले प्रशाला ते महात्मा फुले पुतळा ते प्रशासकीय कार्यालयापर्यंत समता दौड आली. तेथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ही दौड महात्मा फुलेंचा जयजयकार, मानव मानव एक समान, शिक्षा हमारा अधिकार है अशा विविध घोषणा देत महाविद्यालयात परत आली. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या दौडचे आयोजन डॉ. सचिन नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. कैलास कांबळे तसेच सहाय्यक कुलसचिव वैभव बारटकके यांनी केले.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments