adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्यापीठ प्रकल्पग्रस्त उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी होणार

 विद्यापीठ प्रकल्पग्रस्त उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी होणार  जावेद शेख/ राहूरी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महात्मा फुले कृषि विद्यापीठ...

 विद्यापीठ प्रकल्पग्रस्त उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी होणार 


जावेद शेख/ राहूरी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यातील ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या प्रकल्पाकरीता जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांना सरळसेवेने रिक्त पदांवर भरती करण्यासाठी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार दि.३१- १२- २०२४ रोजी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदरच्या जाहिरातीमधील गट क व गट ड या संवर्गातील एकुण १४ पदांच्या टी.सी.एस. या कंपनीमार्फत दि. १६ मार्च, २६ ते १८ मार्च, २०२६ या कालावधीत लेखी परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षेच्या प्राप्त निकालाच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने प्रकल्पग्रस्त उमेदवारांचे पदनिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबत संबंधीत उमेदवारांना बुधवार दि. २९ जुलै,२०२६ रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी विहीत वेळेत उपस्थित राहण्याबद्दल विद्यापीठ प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

--------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111

No comments