adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धान्य पुरवठ्यातील अनियमिततेची गंभीर दखल; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व तहसीलदारांना चौकशीचे आदेश

 धान्य पुरवठ्यातील अनियमिततेची गंभीर दखल; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व तहसीलदारांना चौकशीचे आदेश  जळगाव  प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...

 धान्य पुरवठ्यातील अनियमिततेची गंभीर दखल; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व तहसीलदारांना चौकशीचे आदेश 


जळगाव  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांना होणाऱ्या धान्य पुरवठ्यात अनियमितता होत असल्याच्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केलेल्या तक्रारीत स्वस्त धान्य दुकानांना वितरित होणाऱ्या गहू व तांदळाच्या पोत्यांबाबत अनेक गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या होत्या. संबंधित धान्याच्या पोत्यांवर अधिकृत सील अथवा मशीनद्वारे केलेली शिवण नसून अनेक पोती हाताने शिवलेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्याचे आणि महिन्याच्या अखेरीस धान्य पुरवठा होत असल्यामुळे लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी सर्व तहसीलदारांना तातडीने सखोल चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चौकशीचा अहवाल संबंधित तक्रारदारास कळविण्याबरोबरच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य पुरवठा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याबरोबरच अनियमिततेला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाभार्थ्यांना दर्जेदार धान्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments