नवीन आपले सरकार केंद्र आयडी प्रदान करण्यासाठी दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत शौकतभाई शेख / श्रीरामपूर (संपादक -:- हेम...
नवीन आपले सरकार केंद्र आयडी प्रदान करण्यासाठी दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत
शौकतभाई शेख / श्रीरामपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रात नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी प्रदान करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
परंतू ८८ ग्रामपंचायतींमध्ये एकही ऑनलाइन अर्ज प्राप्त झाला नाही, त्या ग्रामपंचायतींतील रिक्त जागांसाठी १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सदस्य सचिव दादासाहेब गिते यांनी केले आहे.
या रिक्त जागांसाठी ८ जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत https://ahilyanagaraaplesarkar.com या संकेतस्थळावर पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावेत. अर्जासाठीच्या अटी व शर्ती पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसारच लागू राहतील.
रिक्त ग्रामपंचायतींमध्ये अहिल्यानगर तालुक्यात ४, अकोले ३३, जामखेड ६, कर्जत २, कोपरगाव ४, नेवासा २, पारनेर ७, पाथर्डी ६, राहुरी ५, संगमनेर १५, शेवगाव २, श्रीगोंदा १ तर श्रीरामपूर तालुक्यात २ अशा एकूण ८८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रिक्त ८८ ग्रामपंचायतींची नावे https://ahilyanagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही कळविण्यात आले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments