adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ॲड.विश्वासराव मोतीवाले यांना आदर्श सरकारी वकील पुरस्कार-२०२६

  ॲड.विश्वासराव   मोतीवाले यांना आदर्श सरकारी वकील पुरस्कार-२०२६  अडावद / जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद :-  येथून जवळच ...

 ॲड.विश्वासराव   मोतीवाले यांना आदर्श सरकारी वकील पुरस्कार-२०२६ 


अडावद / जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद :-  येथून जवळच असलेल्या रुधांटी ता अमळनेर येथील सरकारी वकील व नोटरी पब्लिक ( भारत सरकार ) ॲन्ड व्ही डी मोतीवाले यांना    राज्य स्तरिय आदर्श सरकारी वकील पुरस्कार नुकताच पुणे येथे देण्यात आला 

 पुणे येथे *प्रहार युथ ऑर्गनायझेशन, राष्ट्रभक्ती परिवार, सेवार्थ सोशल फाउंडेशन,सायबर सुरक्षा साथी,सन्मान सोहळा व्यवस्थापन विजेता मिडिया इत्यादीच्या संयुक्तिकपने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा,पुणे2026* हा कार्यक्रम अत्यंत भव्य, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रातील वकीली क्षेत्र समाजकार्य,वैद्यकीय व इतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवीत हा सोहळा पार पडला.

*या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचकुले, ॲड.व्ही.डी.मोतीवाले, सरकारी वकील व नोटरी पब्लिक(भारत सरकार), कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल खंडारे चेअरमन,स्वराज कॉलेज ग्रुप,कार्यक्रम आयोजक व संयोजक मा.सुनिल सुरेश गोरे,सौ. भारतीताई रमेश तुपे, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रभक्ती महिला संघटन महाराष्ट्र,मा.अशोक बेलापूर सायकलपटू,डॉ.श्वेता खोपडे,दिपक कांबळे, अध्यक्ष,स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती संघटन,मा.संदीप रासकर उत्कृष्ट निवेदन इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.सदर कार्यक्रमातील* प्रमुख पाहुणे आदरणीय अभिजीत बिचकुले  गोपाल खंडारे   सुनिल गोरे  व भारती तुपे मॅडम यांच्या शुभहस्ते ॲड.विश्वासराव  मोतीवाले,सरकारी वकील व नोटरी पब्लिक (भारत सरकार) यांना **आदर्श विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026*चा त्यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळेस त्याच्या गळ्यात राष्ट्रभक्तीची तिरंगी शाल सह गोल्डन पदकपरिधान करण्यात येऊन,सन्मानचिन्हट्रॉफी देऊन,त्यांना गौरव करण्यात येऊन,त्यांचे अभिनंदन करून,त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ॲड.मोतीवाले  त्यांच्या 30 वर्षाच्या वकीली क्षेत्रातील,त्यांचे सरकारी वकील म्हणून केलेले चांगले भरीव उल्लेखनीय कार्य व उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल त्यांना आदर्श विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र रत्न पुरस्कार-2026* देण्यात आला.त्यावेळी त्यांनी आपले वकीली क्षेत्रातील कार्या बद्दल त्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले ,

श्री मोतीवाले यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे अमळनेर व चोपड़ा परिसरातील नागरिकांनी अभिनंदन व्यक्त केले आहे  


फोटो कॅप्शन पुणे येथे सरकारी वकिल ॲन्ड व्ही डी मोतीवाले यांना राज्य स्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी त्यांचा सत्कार अभिजीत बिचकुले गोपाल खंडारे सुनील गोरे भारती तुपे  आदी मान्यवर

No comments